ब्युरो टीम: निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंना
दिल्यानंतर संसदेतील शिवसेना
कार्यालय मिळावं, यासाठी गटनेते राहुल शेवाळे यांनी लोकसभा
सचिवालयाला पत्र दिले होते.
त्यावर लोकसभा सचिवालयाकडून पत्र
पाठवून संसदेतील शिवसेना कार्यालय शिंदेच्या शिवसेनेला ताबा दिल्याचे पत्र शेवाळेना
पाठवले आहे.
सत्ता संघर्षाच्या वादानंतर निवडणूक
आयोगाने शिवसेना पक्ष हे नाव व धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्याने शिंदे गटाचे नेते
खासदार राहुल शेवाळे यांनी संसदेतील पक्षकार्यालय मिळावे यासाठी लोकसभ सचिवालयाला
पत्र लिहिले होते. त्यावर सचिवालयाने पत्र पाठवत संसद्तील शिवसेना कार्यालय शिंदे
गटाच्या ताब्यात दिले आहे.
परतू यामुळे ठाकरे गटाला जोरदार धक्का बसला आहे यावर ते काय भूमिका घेतात याकडे
राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा