ब्युरो टीम : भाजपा महाराष्ट्र सोशल मीडिया प्रदेश प्रभारी म्हणून प्रदेश सचिव श्वेता शालिनी यांची नियुक्ती करण्यात आलीय. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी ट्विट करीत ही माहिती दिली.
सोशल मीडियावर भारतीय जनता पक्ष खूपच अॅक्टिव्ह आहे. केंद्र व राज्य सरकारच्या नवनवीन योजनांची माहिती देणं, विरोधकांवर टीका करणं, विरोधकांनी केलेल्या टिकेला प्रत्युत्तर देणं आदींसाठी पक्षाकडून सातत्यानं सोशल मीडियाचा वापर करण्यात येतो. सोशल मीडियावर भाजपला फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यातच आता मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील विविध महानगरपालिकांच्या निवडणुका, राज्यातील जिल्हा परिषदा, पंचायत समिती, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांची तयारी आतापासूनच भाजपानं सुरू केलीय. त्याच अनुषंगानं योग्य व्यक्तीला योग्य जबाबदारी देण्याचं धोरण पक्षानं स्वीकारल असून त्यानुसार नियुक्त्या सुद्धा करण्यात येऊ लागल्या आहेत. राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांतील नेत्यांना भाजप प्रदेश प्रवक्तेपदी संधी दिल्यानंतर आता भाजपनं सोशल मीडियासंबंधी नियुक्ती सुद्धा करण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून पक्षानं सोशल मीडिया प्रदेश प्रभारी म्हणून श्वेता शालिनी यांची निवड करण्यात आलीय.
प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडणार : श्वेता शालिनी
सोशल मीडिया प्रदेश प्रभारी म्हणून संधी दिल्याबद्दल श्वेता शालिनी यांनी भाजपचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानलेत. आपल्या ट्विटमध्ये श्वेता शालिनी यांनी म्हटलं आहे की, ‘महाराष्ट्र सोशल मीडिया प्रदेश प्रभारी म्ह्णून माझी निवड केल्याबद्दल मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानते. येणाऱ्या काळात पक्ष आणि लोकांसाठी माझे कर्तव्य प्रामाणिकपणे आणि प्रभावीपणे पार पाडीन.’
टिप्पणी पोस्ट करा