ब्युरो टीम: देशभरात वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये दलित, बहुजन विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होत आहेत. त्याचा विरोध व निषेध म्हणून सावित्रीबाई फुले
पुणे विद्यापीठात विद्यापीठ कृती समिती व स्टुडट फेडरेशन ऑफ इंडिया च्या वतीने निर्देशन
करण्यात आले. रोहित वेमुल्ला, पायाल तडवी, दर्शन सोलंकी
अशा असंख्य विद्यार्थी जातीयतेचे बळी ठरले आहेत त्यामुळे अशा होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी
रोहित ACT लागू करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शैक्षणिक संस्थामध्ये वाढत
चाललेला जातीवाद थांबवा यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. तसेच त्यांना
माणूस म्हणून वागणूक मिळाली पाहिजे अशी
भूमिका यावेळी विद्यार्थ्याकडून करण्यात आली. यावेळी दोन्ही संघटनाच्या वतीने
उपस्थित विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जातिव्यवस्थेचे निर्मूलन (Annihilation of Caste/ ॲन्हिलेशन ऑफ कास्ट) हा ग्रंथ भेट म्हणून
देण्यात आला .
यावेळी विद्यापीठ कृती
समितीचे राहुल ससाणे सागर नाईक, ओम बोदले , शिवानी गित्ते, तुकाराम शिंदे, अनिक गायकवाड , हंसराज, अदिनाथ जावीर (कृती
समिती) , कमलाकर शेटे (युक्रांद), प्रार्थना तांबे, सोमनाथ निर्मळ, प्रिया उदमले, प्रिया उगले, ( SFI ) , श्रावणी बुवा, निहारीका (NSA) , इ. विद्यार्थी व प्रतिनिधींनी आपले मते व्यक्त केली .
टिप्पणी पोस्ट करा