Sujay Vikhe : खासदार विखेंसमोर भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले, 'या' जिल्ह्यातील प्रकार



ब्युरो टीम : भाजपचे नगर जिल्ह्यातील खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्यासमोर भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडल्याचा प्रकार घडला आहे. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील कार्यक्रमात हा प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, खासदार विखे यांना मध्यस्थी करत या वादावर पडदा टाकला. पण अद्यापही तणाव कायम आहे. 

लोणी व्यंकनाथ या ठिकाणी खासदार विखे हे एका उद्घाटनाचा कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी आमदार बबनराव पाचपुते, गणपतराव काकडे, भगवानराव पाचपुते आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात खासदार विखे यांच्यासमोर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांमध्ये राडा झाला. त्यामुळे येथ काही काळ तणाव होता. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांचे तुफान शाब्दीक युद्ध झाले. या प्रकरणात खासदार विखे यांनी हस्तक्षेप करुन वाद मिटवला. 'सगळे आपलेच कार्यकर्ते आहेत, जिल्हा परिषद निवडणूका होवू द्या सगळे ठिक होईल,' असे सूचक वक्तव्य विखे यांनी यावेळी केले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने