suprime court:हिंदू धर्माची महानता खूप मोठी आहे. तुम्ही ती लहान करू नका; सर्वोच्च न्यायालयाने भाजप नेत्याला खडसावले



ब्युरो टीम:हिंदू धर्म ही जगण्याची एक पद्धती आहे. हिंदू धर्माची महानता खूप मोठी आहे. तुम्ही ती लहान करू नका, असे म्हणत देशासमोरचे इतर प्रश्न संपलेत का? तुम्हाला देश कायम अशांत ठेवायचाय का? अशा स्पष्ट शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्या भाजप नेत्याला खडसावले आणि 'नाव बदल आयोगा'ची स्थापना करण्याची मागणी फेटाळली.

भाजपचे दिल्लीतील नेते आणि सर्वोच्च न्यायालयातील वकील अश्विनीकुमार उपाध्याय यांनी याचिका दाखल केली होती. देशावर आक्रमण करणाऱया परकीय शासकांची नावे अनेक शहरांना, रस्त्यांना, ऐतिहासिक ठिकाणांना दिली आहेत. औरंगजेब, लोधी, गझनी आदींची नावे दिली आहेत. त्यांचे हिंदुस्थानशी काय नाते आहे? त्यामुळे ऐतिहासिक स्थळांची नावे बदलण्यासाठी पेंद्र सरकारने 'नाव बदल आयोगा'ची स्थापना करावी, अशी मागणी उपाध्याय यांनी याचिकेत केली होती.

न्यायमूर्ती के. एम. जोसेफ आणि न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांच्या खंडपिठापुढे सुनावणी झाली. न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्या भाजप नेत्याला परखड शब्दांत सुनावत ही याचिका फेटाळली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने