T20 WC : पाकिस्तानच्या ठेचल्या नांग्या, भारतीय महिलांनी कमाल केली


ब्युरो टीम : आजची रविवारची रात्र भारतीयांसाठी आनंदाची बातमी घेऊन येणारी ठरली आहे. भारतीय संघाने रविवारी महिला टी२० विश्वचषकातील आपल्या मोहिमेला विजयाने सुरुवात केली. भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होता.  जेमिमाह रॉड्रिग्स-रिचा घोषच्या अफलातून फलंदाजीच्या जोरावर भारतीय महिलांनी विश्वचषकातील पहिला विजय नोंदवला अन् पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या.

केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे हा सामना खेळला गेला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकांत ४ गडी गमावून १४९ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने १९ व्या षटकात तीन विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. भारताला विजयासाठी शेवटच्या तीन षटकात २८ धावांची गरज होती. मात्र, रिचा आणि जेमिमाह यांच्या मनात काही वेगळेच होते. १८व्या षटकात रिचाने सलग तीन चौकार मारत पहिल्या सामन्याचा मार्गच बदलला. यानंतर तीने १९व्या षटकात पुन्हा तीन चौकार मारून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. १९व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर जेमिमाहला अर्धशतक पूर्ण करण्यासाठी एका धावेची गरज होती. तीने चौकार मारून आपले अर्धशतकही पूर्ण केले आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने