Umesh Pal Murder Case : उमेश पाल हत्याकांडातील आरोपी चकमकीत ठार



ब्युरो टीम : उत्तरप्रदेश मधील प्रयागराजमध्ये येथे झालेल्या उमेश पाल हत्याकांडीतील गुन्हेगार अरबाज पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेला आहे. लखनऊ येथील कायदा-व्यवस्था एडीजी (ADG)  प्रशांत कुमार यांनी ही माहिती दिली आहे.

आज, सोमवारी ( २७ फेब्रुवारी)  दुपारी धुमनगंज भागात अरबाजसोबत पोलिसांची चकमक झाली. यात अरबाज गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. जिथे त्याच मृत्यू झाला.

दरम्यान, मागील आठवड्यात शुक्रवारी उमेश पाल यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली होती. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अरबाजचा चेहरा दिसत होता. यानंतर घटनेवेळी वापरण्यात आलेली गाडी अरबाज वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. आरोपीसह अन्य दोघे प्रयागराजच्या धूमनगंज परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तेथे छापा टाकला असता. आरोपींची पोलिसांसोबत चकमक झाली. यात पोलिसांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात अरबाजला छातीत आणि पायाला गोळ्या लागल्या. गंभीर जखमी अवस्थेत अरबाजला उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात आले होते. परंतु, तेथे त्याचा मृत्यू झाला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने