Valentine Day... आज पासून प्रेमाचा आठवडा सुरु .. प्रेम व्यक्त करण्यासाठी तरुण करतायत आठवड्याचे नियोजन




 ब्युरो टीम: प्रेम…म्हणजे  माणसाच्या आयुष्यातील एक सुख अन दुख देणारा हलवा कप्पा ... असे असले तरी प्रत्येक जन आयुष्यात एकदा  कुणाच्या तरी  प्रेमात पडतोच .. म्हणूनच तो साजरा करतानाही लोक नियोजन करताना दिसतात पण प्रेम करण्यसाठी कॅलेंडरच्या नियोजनाची गरज आहे का असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला  असणार  आहे त्याची उत्तर आज मिळणार आहेत. 

प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असते कि तिच्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी फक्त एका निमित्त्ची गरज असते. म्हणून तर प्रेमात अडकलेल्यांनसाठी फेब्रुवारी महिना खास असतो. एवढेच काय हा महिना प्रेम व्यक्त करण्याचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात आपण आपल्या खास व्यक्तीवर असलेले प्रेम व्यक्त करतो. परंतु आपल्याला फक्त व्हॅलेंटाईन डेव्हा माहित आहे. त्याच्या अगोदर आठवडाभर असणारे दे आपल्या माहित अस्द्याला हवेत म्हणून हा सगळा खटाटोप करतोय. याची खरी सुरुवात ७ फेब्रुवारीला होते अन शेवट व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी म्हणजे १४ फेब्रुवारीला होतो. तर जाणून घेऊ अन साजरे  करू हे सगळे डेया सर्व डे ... 

यावर्षीचा व्हॅलेंटाईन डे चा आठवडा 

  ७ फेब्रुवारी – रोज डे, गुरुवार ८ फेब्रुवारी – प्रपोज डे, शुक्रवार ९ फेब्रुवारी – चॉकलेट डे, शनिवार १० फेब्रुवारी – टेडी डे, रविवार ११ फेब्रुवारी – प्रॉमिस डे, सोमवार १२ फेब्रुवारी – हग डे, मंगळवार १३ फेब्रुवारी – किस डे , बुधवार १४ फेब्रुवारी – व्हेंलेंटाईन डे , 

सांगायचं झालं तर, आपण आपल्या आवडत्या व्यक्तीकडे केव्हाही प्रेम व्यक्त करु शकतो. प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही दिवसाची किंवा महिन्याची गरज नसते. पण फेब्रुवारी महिन्याची गोष्टच वेगळी असते. जर तुम्ही कोणावर प्रेम करत आसला आणि त्या व्यक्तीला तुमच्या मनातील भावना सांगण्याचा प्रयत्न करत असाल, तर फेब्रुवारी महिन्याचा प्रेमाचा आठवडा प्रचंड खास आहे. जर तुम्ही प्रेमाच्या आठवड्यात योग्य संधी साधून आवडत्या व्यक्तीला प्रपोज केलात, तर ती व्यक्ती देखील प्रचंड आनंदी होईल.

१४ फेब्रुवारी हा दिवस प्रेम करणाऱ्यांसाठी प्रचंड खास आणि स्पेशल असतो. या दिवशी सर्वत्र आनंद साजरा केला जातो. सर्वप्रथम अमेरिकेत व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला, त्यानंतर हळू-हळू हा दिवस संपूर्ण जगात साजरा होवू लागला. व्हॅलेंटाईन डेच्या आठवड्याची सुरुवात कायम ७ फेब्रुवारी पासून होते आणि १४ फेब्रुवारीपर्यंत प्रेमाचा आठवडा साजरा करण्यात येतो.

या  सात दिवसात आपण फक्त पार्टनर नाही तर आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीवर देखील प्रेम व्यक्त करू शकतो. भाऊ बहिण आई बाबा , मित्र परिवार या सर्वावर आपण प्रेमाचा वर्षाव करू शकतो. या आठवड्यात आपण आपल्या प्रिय व्यक्तीला खास भेट वस्तू देऊ शकतो. आणि आपले प्रेम व्यक्त करू शकतो. 


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने