valentine week 2023 : प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं...



ब्युरो टीम : 'प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं...’ कविवर्य मंगेश पाडगावकरांची ही कविता एकदा ऐकली की कायम मनात गुणगुणत राहते. ‘व्हॅलेंटाइन वीक’जवळ आला, तर तरुणाईच्या व्हाट्सअप स्टेटसपासून ते सोशल मीडियापर्यंत ही कविता धुमाकूळ घालते ‘रोझ डे’पासून ‘व्हॅलेंटाइन वीक’ची सुरुवात होते. यंदा हा दिवस येत्या मंगळवारी (७ फेब्रुवारी) आहे.

तरुणाईच्या उत्साहाला उधाण आणणारा व्हॅलेंटाइन वीक मंगळवारपासून सुरू होत आहे. ‘व्हॅलेंटाइन वीक’ साजरा करण्याचा प्लॅन केलेल्या प्रेमवीरांच्या खिशाला मात्र यंदा सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे ‘रोझ डे’लाच झळ बसण्याची शक्यता आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा गुलाबाच्या फुलांचे उत्पादन कमी झाल्यामुळेयंदा गुलाबाच्या किंमती वाढणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे गुलाबाच्या एका फुलासाठी साधारणपणे वीस ते पंचवीस रुपये प्रेमवीरांना मोजावे लागणार आहेत.

यादिवशी प्रेमाचे प्रतीक म्हणून समजले जाणारे गुलाबाचे फूल आपल्या आवडत्या व्यक्तीला दिले जाते. बाजारात आलेल्या गुलाबाच्या फुलांमधील मोहक आणि ताजे असे गुलाब निवडून आपल्या मनातील प्रेमाची ‘नाजूक’ भावना व्यक्त करण्यासाठी त्याची खरेदी केली जाते. यंदा मात्र सातत्याने बदलत्या वातावरणाचा फुलांच्या उत्पादनाला फटका बसला आहे. त्यामुळेच किंमती वाढण्याची शक्यता असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

असे आहे ‘डे टू डे’ सेलिब्रेशन

७ फेब्रुवारी : रोझ डे

८ फेब्रुवारी : प्रपोज डे

९ फेब्रुवारी : चॉकलेट डे

१० फेब्रुवारी : टेडी डे

११ फेब्रुवारी : प्रॉमिस डे

१२ फेब्रुवारी : हग डे

१३ फेब्रुवारी : किस डे

१४ फेब्रुवारी : व्हॅलेंटाइन डे

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने