valentine week special : 'रोझ डे' च्या दिवशी प्रेमवीरांच्या खिशाला झळ


ब्युरो टीम
: ‘व्हॅलेंटाइन वीक’ साजरा करण्याच्या प्लॅन केलेल्या प्रेमवीरांच्या खिशाला गुलाबाचे भाव दुपटीने वाढल्यामुळे या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे ‘रोझ डे’लाच झळ बसली. मंगळवारी (७ फेब्रुवारी) एका गुलाबाच्या फुलासाठी प्रेमवीरांना चाळीस ते पन्नास रुपये मोजावे लागले. ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी तर या किमती आणखी वाढण्याचा अंदाज फुलांच्या विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे.

तरुणाईच्या उत्साहाला उधाण आणणारा प्रेमाचा सप्ताह म्हणजे ‘व्हॅलेंटाइन वीक’. ‘रोझ डे’पासून याची सुरुवात होते. यादिवशी प्रेमाचे प्रतीक म्हणून समजल्या जाणारे गुलाबाचे फूल आपल्या आवडत्या व्यक्तीला दिले जाते. यंदा मात्र गुलाब फुलांची आवक कमी असल्यामुळे ‘रोझ डे’च्या दिवशीच गुलाबाच्या किमती दुपटीने वाढल्या होत्या. सोमवरपर्येंत पंधरा ते वीस रुपयांपर्यंत मिळणाऱ्या गुलाबासाठी मंगळवारी (७ फेब्रुवारी) तब्बल २० ते २५ रुपये मोजावे लागत होते. मात्र, त्यानंतरही गुलाबांच्या फुलांच्या खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत होता. बाजारात आलेल्या गुलाबाच्या फुलांमधील मोहक आणि ताजे असे गुलाब निवडून आपल्या मनातील प्रेमाची ‘नाजूक’ भावना व्यक्त करण्यासाठी त्याची खरेदी केली जात होती. गुलाबाच्या फुलाच्या किंमती वाढल्यामुळे प्रेमवीरांच्या खिशाला ‘व्हॅलेंटाइन वीक’च्या पहिल्याच दिवशी झळ बसली असली, तरी त्याची पर्वा न करता या सप्ताहातील पहिला दिवस म्हणजेच ‘रोझ डे’ उत्साहात साजरा करण्यात आला.

असे आहे ‘डे टू डे’ सेलिब्रेशन

७ फेब्रुवारी : रोझ डे

८ फेब्रुवारी : प्रपोज डे

९ फेब्रुवारी : चॉकलेट डे

१० फेब्रुवारी : टेडी डे

११ फेब्रुवारी : प्रॉमिस डे

१२ फेब्रुवारी : हग डे

१३ फेब्रुवारी : किस डे

१४ फेब्रुवारी : व्हॅलेंटाइन डे

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने