Vani Jayram : गायिका वाणी जयराम यांचे निधन; वयाच्या ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास



ब्युरो टीम : मनोरंजन क्षेत्रासाठी धक्कादायक बातमी आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्गज पार्श्वगायिका वाणी जयराम यांचे निधन झाले. चेन्नईतील नुंगमबक्कम येथील हॅडोस रोडवरील त्यांच्या घरी या प्रसिद्ध गायिकेने अखेरचाा श्वास घेतला. त्या ७८ वर्षांच्या होत्या. संगीतविश्वाला धक्का देणारी ही बातमी आहे. वाणी जयराम यांना यावर्षी अलीकडेच 'पद्मभूषण' या भारतातील तिसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

वाणी जयराम यांनी संगीत विश्वातील मोठ्या संगीतकारांसोबत काम केले होते. त्यांनी अनेक सदाबहार गाणी दिली. तामिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम, हिंदी, उर्दू, मराठी, बंगाली, भोजपुरी, तुलू आणि ओरिया असा विविध भाषांमधीलत् यांनी  गाणी गायली. वाणी यांनी देशात आणि जगभरात परफॉर्म करत भारतीय संगीताचे नाव मोठे केले. उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांना तीन वेळा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका या श्रेणीमध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे.  तामिळनाडू, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, केरळ, गुजरात आणि ओडिशा या राज्यांकडून राज्य पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने