vikhe patil :प्रवरानगर येथे राज्यस्तरीय महसूल परिषदेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी केले उद्घाटन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची उपस्थिती

 


ब्युरो टीम: अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथे महसूल आणि वन विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय महसूल परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ई-चावडी या संकेतस्थळाचे तसेच लोकार्पण तसेच लोणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या व मुलींच्या शासकीय वसतीगृहाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी परिषदेसाठी राज्यभरातून आलेल्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

प्रवरानगरच्या ज्या भूमीत स्वर्गीय पद्मश्री विठ्ठलराव विखे यांनी सहकाराची बीजे रोवली त्या मातीत ही परिषद पार पडत असल्याचा विशेष आनंद होत असल्याचे मत यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलताना व्यक्त केले.

महसूल विभाग हा राज्याच्या प्रशासनातील अत्यंत महत्वाचा विभाग असून या विभागाच्या माध्यमातून ५५ सेवा नागरिकांकरिता उपलब्ध करून देण्यात येतात. महसूल विभाग जो महसूल जमा करतो त्यावर राज्याचा बराचसा खर्च अवलंबून असतो. सध्या महसूल विभागासमोर अनेक आव्हाने आहेत. विभागास चांगली वाहने देण्याबाबत सरकार सकारात्मक असून ही मागणी नक्की पूर्ण केली जाईल असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. .

आपल्या माध्यमातून ई प्रॉपर्टी कार्ड, ४ लाखांहून अधिक फेरफार, ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून अपलोड करणे, जिल्ह्याच्या नकाशांचे आणि जमिनीच्या लीजचे डिजिटायझेशन करण्यात येत असून ही सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारी बाब आहे. राज्यातील शासकीय अधिकारी हे प्रशासनाचा चेहरा असून आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त लोकांशी संवाद साधायला हवा अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त केली. तुमच्या माध्यमातून सरकारची भूमिका तयार होत असल्याने त्याबद्दल अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

महसूल विभागाचा कारभार हा पारदर्शक आणि वेगवान हवा अशी अपेक्षाही व्यक्त केली. कोणत्याही प्रकल्पाचे यश हे जमीन अधिग्रहण किती वेळेत होत त्यावर अवलंबून असते त्यामुळे प्रकल्पांचा वेग वाढवायचा असल्यास जमीन अधिग्रहण वेळेवर करायला हवे असेही याप्रसंगी सूचित केले.

यावेळी राज्याचे महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भूमरे, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, खासदार सदाशिवराव लोखंडे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, प्रवरा मेडिकल ट्रस्ट चे डॉ.राजेंद्र विखे-पाटील तसेच राज्यभरातून आलेले महसूल आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने