Viral Infaction :वातावरणात सतत होणाऱ्या बदलामुळे आरोग्य जपण्यासाठी पुढील युक्ती वापरून व्हायरल आजार टाळा


ब्युरो टीम: आजकाल अशा वातावरणात आजारी पडण्याचे प्रमाण अधिक असते या हवामानामध्ये ताप, सर्दी, खोकला अशा समस्या निर्माण होऊ शकतात. या समस्यपासून दूर राहण्यासाठी तुम्हाला पोषक आहाराचे सेवन करणे गरजेचे असते. अशा आजारापासून दूर राहण्यासाठी आपल्या रोजच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करणे गरजेचे आहे. या पदार्थांचे सेवन केल्याने आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शन पासून स्व:तचा बचाव करण्यासाठी तुम्ही पुढील गोष्टींचा आहारात समावेश करू शकता. 

गुळ

         व्हायरल आजारापासून स्व:तचे संरक्षण  करण्यासाठी तुम्ही  रोजच्या आहारात गुळाचे सेवन करू शकता , गुळामध्ये  भरपूर प्रमाणात आयर्न आढळून येते. गुळाच्या सेवनाने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल त्यामुळे आपल्या शरीराला होणारा त्रास कमी होईल. 

तूप 

        रोजच्या आहारात डाळ व भाजीपाल्यासोबातच मिसळून तुपाचे सेवन करू शकता यामुळे शरीरातील उर्जा वाढते. त्याच बरोबर तुपाच्या सेवनाने कोरड्या त्वचेची समस्या देखील दूर होऊ शकते. त्यामुळे नियमितपणे आहारात तुपाचे सेवन करावे. आणि व्हायरल इन्फेक्शन पासून स्व:तचा बचाव करावा. 

बाजरीची भाकरी 

       आपल्या शरीरासाठी फायबरची आवश्यकता असते ते बाजरीमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येते. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शन पासून दूर राहण्यासाठी रोजच्या आहारात तुम्ही बाजरीचा वापर करू शकता. त्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण कमी होईल. 

आवळा

       रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यसाठी रोजच्या आहारात आवळा व्पाराला पाहिजे त्याचे तुम्ही रास, मुरब्बा, आवळ्याची चटणी बनवून खाऊ शकता. यामध्ये फायबर, प्रोटीन, मिनरल आढळून येतात हे गुणधर्याम शरीराला निरोगी ठेवण्यास  मदत करतात.  व्हायरल इन्फेक्शन पासून स्व:तचे संव्रक्षण  करू शकता. 


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने