Viral Video : नागपूरमध्ये शिंदे गटाचे आमदार आक्रमक होत म्हणाले 'मी रस्त्यावर झोपणार आहे…'



ब्युरो टीम : नागपूर येथील रामटेक मतदारसंघातील शिंदे गटाचे आमदार आशिष जयस्वाल यांनी रस्त्यावरच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फैलावर घेतलं. ते पोलिसांवर संताप व्यक्त करत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात आमदार जयस्वाल यांनी नागपूर पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच 'मी आज रस्त्यावर झोपणार आहे,' असा इशाराही दिला.


नागपूरमधील नांगर-कन्हानच्या आठवडी बाजारात काही गुंडप्रवृत्तीच्या लोकांनी  दुकानांची तोडफोड केली. तेव्हाचा व्हिडिओ असल्याची माहिती मिळाली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने