WATCH VIDEO: दिल्ली महापालिकेत नगरसेवकांमध्ये तुफान राडा



ब्युरो टीम : दिल्ली महापालिकेत भारतीय जनता पार्टी आणि आम आदमी पार्टीच्या नगरसेवकांमधील वाद थांबायचं नाव घेत नाहीये. या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये काल, शुक्रवारी जोरदार राडा झाला. दोन्ही पक्षातील नेत्यांनी एकमेकांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली आहे. दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमधील वादाचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालेत.



मागील काही दिवसांपासून दिल्ली महापालिकेत भाजप आणि आप च्या नगरसेवकांमध्ये अनेकदा राडा झाला. शुक्रवारी पुन्हा याची पुनरावृत्ती झाली. सभागृहात नगरसेवकांनी एकमेकांना केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ समोर आलाय. हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. यामध्ये नगरसेवकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी पाहायला भेटतेय. नगरसेवक एकमेकांचा पाठलाग करून  धक्काबुक्की करीत आहेत. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. नेटकऱ्यांकडूनही यावर प्रतिक्रिया येत आहेत.

दरम्यान, दिल्ली महापालिकेत स्थायी समितीच्या निवडीसाठी आज मतदान पार पडलं. मतमोजणी सुरू असताना हा राडा झाला.

पहा व्हायरल व्हिडीओ



0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने