Wine : मद्यप्रेमींना आवडतील ‘हे’ देश, जाणून घ्या कारण


ब्युरो टीम : जगभरात असे अनेक देश आहेत, जिथे दारू पिण्याची परंपरा खूप अनोखी आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, काही देशांमध्ये बुटामध्ये दारू टाकून पितात, तर कुठे दारू पिताना चिअर्स म्हणण्यास बंदी आहे. जगातील काही देश असे आहेत, जेथे दारू पिण्यासोबत त्यासंबंधीत वैशिष्ट्यपूर्ण परंपरा देखील जपली जाते. आज आम्ही तुम्हाला दारू पिण्यासंबंधी वेगवेगळी परंपरा जपणाऱ्या अशाच देशांची माहिती देणार आहोत. हे देश मद्यप्रेमींना नक्कीच आवडतील.

जर्मनीमध्ये दारू पिण्यासंबंधी एक अनोखी परंपरा जपली जाते. येथे लग्नसोहळ्याच्या वेळी वराचा मित्र वधूचे अपहरण करतो, आणि तिला बारमध्ये घेऊन जातो. त्यानंतर तो बारमध्ये नवरदेव येण्याची वाट पाहतो. जेव्हा बारमध्ये नवरदेव येतो, तेव्हा त्याला वधू तेथून घेऊन जाण्यासाठी बारमधील प्रत्येकजणाला दारू विकत घेऊन द्यावी लागते.

रशिया आणि पोलंडमध्ये व्होडकामध्ये ज्युस मिसळणं वाईट मानलं जातं. तसेच नेदरलँड्समध्ये ‘कोप-स्टो-चे’ नावाची एक प्रथा आहे.  ज्यामध्ये बारटेंडर एका ग्लासमध्ये जिनेव्हर आणि दुसऱ्या ग्लासमध्ये बिअर ओततो. मद्यपान करणाऱ्याला आधी हात न लावता जिनेव्हर प्यावे लागते, नंतर बिअर.

नायजेरियात लग्नाच्या वेळी नववधूला तिच्या वडिलांकडून वाइनचा ग्लास दिला जातो. यानंतर, नववधू लग्नाला उपस्थित असलेल्या सर्व लोकांसमोर तो वाइनचा ग्लास तिच्या पतीला देते. विशेष म्हणजे, जेव्हा नववधू तिच्या हाताने वाइनचा ग्लास नवरदेवाला देते, तेव्हाच त्या दोघाचं लग्न झालं, असं मानलं जातं. तर, ऑस्ट्रेलियामध्येही लोक आनंदाच्या प्रसंगी त्यांच्या बुटामध्ये दारू पितात. दारू पिण्याआधी अनेकजण ‘चिअर्स’ म्हणतात. पण हंगेरीमध्ये दारू पिताना ग्लास एकमेकांना लावताना ‘चिअर्स’ म्हणायला बंदी आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने