ब्युरो टीम: ज्याच्या
सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडली आहे. शिवसेनेकडून जोरदार
युक्तिवाद करण्यात आला आहे. त्यामुळे सेनेचे नेते प्रचंड आशावादी झाले आहे. तर
शिंदे गटाच्या नेत्यांनीही आपल्यावर अपात्रतेची कारवाई होणार नाही, असा दावा केला
आहे.
शिंदे गटाने जो मेल केला
होता, त्याचे उत्तर काय असेल हे त्यांना माहिती होते. पण, त्यांनी तो
शेवटपर्यंत मेलची माहिती समोर आणली नाही. आम्ही ती बाब कोर्टासमोर आणली आहे, असा खुलासा परब
यांनी केला.
आमच्याकडून कपिल सिब्बल
आणि सिंघवी यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. निकाल राखून ठेवला आहे. ज्या प्रकारे
युक्तिवाद झाला आहे, एका आठवड्यात निर्णय येणे अपेक्षीत आहे. निर्णय
हा ठाकरे गटाच्या बाजूला लागणार आहे, याचे परिणाम राज्यावर पाहण्यास मिळेल, असा विश्वास अनिल
देसाई यांनी व्यक्त केला.
तर, जे काही प्रकरण
घडले आणि त्याबद्दल नोटीस पाठवली होती. दोन्ही गटाची बाजू ऐकली आहे. 16 आमदार
तेव्हा महाविकास आघाडीकडे होते. ते कमी पडले असते तरी मविआकडे बहुमत होते, पण तरीही उद्धव
ठाकरेंनी राजीनामा का दिला. याबद्दल चर्चा झाली. आमदार अपात्र होणार नाही.
उपाध्यक्षांना तो अधिकार नव्हता. त्याबद्दल मुद्दा मांडला आहे, असं राहुल शेवाळे
म्हणाले.
आमचे आमदार अपात्र होऊ
शकत नाही. नबाम रेबिया प्रकरणावर चर्चा झाली आहे. त्याबद्दल निर्णय येईल.
गुवाहाटीमधून आम्ही पत्र पाठवले. पण, त्यावेळी आमदारांना जीवे मारण्याच्या धमक्या
दिल्या होत्या, ते सर्वांनी पाहिलं होतं, असंही शेवाळे म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा