WPL Auction 2023 : स्मृती मंधाना, गार्डनर आणि स्कीवरला मिळाले 3 कोटींपेक्षा जास्त असा झाला वुमन्स प्रीमिअर लीगचा लिलाव

 


ब्युरो टीम: वुमन्स प्रीमिअर लीग 2023 अर्थात डब्ल्यूपीएल 2023 साठी मुंबईत लिलाव प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या लिलावातून स्मृती मंधाना, अॅशले गार्डनर, नताली स्कीवर या 3 खेळाडूंना 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळाली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने स्मृती मंधानाला 3.4 कोटी रुपयांत खरेदी केले. तर अॅशले गार्डनरला गुजरात जायंट्सने 3.2 कोटी रुपयांत खरेदी केले. नताली स्कीवरला मुंबई इंडियन्सने 3.2 कोटी रुपयांत खरेदी केले.

स्मृती मंधाना, अॅशले गार्डनर, नताली स्कीवर या आतापर्यंतच्या लिलावात सर्वात मोठी बोली लागलेल्या खेळाडू ठरल्या. सर्वाधिक 3.4 कोटी रुपयांची बोली स्मृती मंधानासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लावली.

यूपी वॉरियर्सने दीप्ती शर्माला 2.6 कोटी रुपयांत तर गुजरात जायंट्सने बेथ मूनीला 2 कोटी रुपयांत खरेदी केले. मुंबई इंडियन्सने पूजा वस्त्रकारला 1.9 कोटी रुपयांत आणि हरमनप्रीत कौरला 1.8 कोटी रुपयांत खरेदी केले.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने