Accident : देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, नगरजवळ ४ ठार



ब्युरो टीम : गुढी पाडव्याच्या दिवशी देवदर्शन घेऊन मध्यरात्रीच्या सुमारास आपल्या गावाकडे निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातल्याची घटना घडली आहे. नगर जिल्ह्यात शनिशिंगणापूर आणि देवगड येथे दर्शन घेऊन पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील भाविक गावी परत होते.  या भाविकांचा अहमदनगर-पुणे महामार्गावर नगर तालुक्यात कामरगाव शिवारात भीषण अपघात झाला. त्यात चार जण ठार तर ११ जण जखमी झाले.

या अपघाताबाबतची अधिक माहिती अशी की, शिरूर तालुक्यातील आमदाबाद आणि चिंचोली मोर या गावातील १६ जण एका टेम्पोमधून प्रवास करत होते. नगर-पुणे महामार्गावर कामगारगावजवळ पुण्याकडून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या टेम्पोला धडक दिली. भरधाव वेगात असलेल्या ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक टेम्पोवर येऊन आदळल्याचे सांगण्यात आले. या अपघाताच चार जण ठार तर ११ जण जखमी झाले आहेत.अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरिक आणि नंतर पोलीसही मदतीला धावले. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले. या अपघातात चार जण ठार झाले असून त्यामध्ये एका बालकाचाही समावेश आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने