Ajit Pawar : नामांतराला जसे प्राधान्य देतात तसे... अजित पवार स्पष्टच बोलले



विक्रम बनकर, नगर : 'एखाद्या शहराचे नामांतरण करणे हा भावनिक मुद्दा आहे. मला सगळ्या भावनांचा आदर आहे. त्यामुळे कुठल्याही शहराच्या नामांतरावर टीकाटिपणी करण्याचा प्रश्न येत नाही. पण नामांतराला जसे महत्व देतात, तेवढेच महत्त्व लोकांचे प्रश्नाला,  महागाई, बेरोजगारी असे प्रश्न सोडवण्यासाठी देणे गरजेचे आहे,' असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केले. 

नगरमध्ये पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमदार संग्राम जगताप, आमदार अरुण जगताप, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार आदी उपस्थित होते.
'औरंगाबाद व धाराशिव या दोन शहराचे नामांतरण आम्ही महाविकास आघाडी सरकारच्या काळातच केलं होतं. पण नामांतरणाच्या पुढील गोष्टी ह्या केंद्र सरकारच्या हातामध्ये असतात. मात्र नामांतरण जेवढं महत्त्वाचं आहे, तितकंच महागाई कमी करणे, तरुण-तरुणींना रोजगार देणे महत्त्वाचे आहे. त्याकडेही सरकारने लक्ष दिलं पाहिजे,' असे हे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
'नामांतराच्या मुद्द्यावरून दोन समाजामध्ये तेढ पसरू नये, याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. तसेच यापूर्वीही देशांमध्ये अनेक शहरांचे नामांतरण झाले आहे. उत्तर प्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांनीही बहुतांश शहराला महापुरुषांची नावे दिली आहेत,' असेही अजित पवार यांनी सांगतानाच ते म्हणाले,' लोकशाहीमध्ये काम करताना बहुमताचा आदर करून पुढे जायचं असतं. त्यालाच खरी लोकशाही म्हणतात. पण यामधून धर्मा- धर्मामध्ये तेढ निर्माण होणार नाही,' हेही पाहणे गरजेचे आहे.

पहा व्हिडिओ





0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने