Ajit pawar: सत्ताधाऱ्यांना निवडणुकीची भीती, अजित पवार कडाडले.



अनिरुद्ध तिडके, नगर :  'स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याची सरकारला भीती वाटत आहे. त्यामुळेच ते निवडणुका घेत नाही. त्यांना आपल्याला यश मिळेल, असे वाटत नाही. म्हणून ते निवडणुका पुढे ढकलत असावेत,' असा घणाघात राज्याचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले. 

नगर येथे आज शासकीय विश्रामगृहांमध्ये जिल्हा बँकेची बैठक झाल्यानंतर ते बोलत होते. यावेळी आमदार अरुण काका जगताप, आमदार संग्राम जगताप, माजी जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार आदी उपस्थित होते.

'कसबा व चिंचवडच्या निवडणुका पाहता या सत्ताधाऱ्यांना जनतेने नाकारला आहे, ही वस्तुस्थिती आहे. राज्यामध्ये भाजप व शिंदे गटाची झालेली युती ही जनतेला पटलेली नाही,' असे सांगतानाच पवार म्हणाले,

'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जी उभी केलेली शिवसेना आहे, त्याचे पक्ष चिन्ह व नाव हे दुसऱ्यांना दिले, हे सुद्धा जनतेला आवडलेले नाही. खेड या ठिकाणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जोरदार सभा झाली आहे. या सभेला विरोधक राष्ट्रवादीने गर्दी केली, असे म्हणतात. मुळात असे काही नाही, असे त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले. नगर जिल्ह्याचीच काय राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था परिस्थिती गंभीर होत चालली आहे, असा आरोप सुद्धा त्यांनी केला.

'राज्यामध्ये कांद्याचा प्रश्न हा गंभीर झालेला आहे. या संदर्भात आम्ही दोन्ही सभागृहामध्ये या विषयाचा आवाज उठवलेला आहे. कांद्याच्या प्रश्न संदर्भात सरकारने जे काही उत्तर दिलेलं आहे,' ते योग्य नाही. अवघे काही रुपये शेतकऱ्यांना मिळालेले आहे, ही सुद्धा बाब चिंतेचे आहे. ज्या पद्धतीने राज्याने केंद्राची मदत घेऊन नाफेडशी मदत घेणे अपेक्षित होते, हा प्रश्न हाताळायला पाहिजे होता, तसे काही झाले नाही. अजूनही नाफेडणी कांदा खरेदी केली नाही. आज अवकाळी पावसामुळे पुन्हा शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. गहू, हरभरा यासारखी पिके सुद्धा आता या अवकाळी पावसामुळे उध्वस्त झालेली आहे,' असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या होळीमध्ये बेरंग झाला. न सत्ताधारी रंग खेळतात, असे विचारले असता अजित पवार म्हणाले की, 'सण उत्सव हे आपापल्या पद्धतीने साजरे करायचे असतात. जी परंपरा आहे, ती स्वत जपली पाहिजे. याबद्दल दुमत नाही . पण जो शेतकरी वर्ग अडचणीत आहे, त्याच्याकडे सुद्धा आज पाहिले गेले पाहिजे. वास्तविक पाहता तात्काळ मंत्र्यांनी व प्रशासनाने याचे गांभीर्याने लक्ष देऊन पंचनामा करण्याचे आदेश दिले गेले पाहिजे.  तसेच त्यांना दिलासा दिला पाहिजे. मात्र सरकारने हे गांभीर्याने घेतलेले नाही, असेही ते म्हणाले.

राज्यातील सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार केला नाही, यावर विचारले असता पवार यांनी वास्तविक पाहता हा ज्याच्या त्याच्या पक्षाचा व सत्ताधाऱ्यांचा विषय असतो. सध्याच्या सरकारमध्ये मोठा पक्ष असल्यामुळे वरिष्ठांना विचारावे लागत असावे. दिल्लीला विचारावे लागत असावे. हे असे आपण अनेक वेळा बघतो. असा टोलाही त्यांनी लगावला

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने