ajit pawar: आता..मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपची साथ सोडणार का? विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी पकडला कळीचा मुद्दा...

 


ब्युरो टीम: महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेना आमदारांना निधी दिला नाही असे म्हणत महाविकास आघाडीतून बाहेर पडत भाजपासोबत सरकार स्थापन केल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी टीका करत अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपची साथ सोडणार का असा प्रश्न विचारला आहे.

महाविकासा आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्री असणाऱ्या अजित पवार यांनी सर्वाधिक निधी राष्ट्रवादी काँग्रेसला दिला. शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न अजित पवार करत आहेत असा आरोप एकनाथ शिंदे यांनी करत पक्ष वाचविण्यासाठी महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याचे म्हटले होते. त्यावर शिंदे फडणवीस सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खोचक प्रश्न विचारला आहे.

शिवसेना वाचविण्यासाठी आम्ही भाजपसोबत जात आहोत असे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केले. पण, अर्थमंत्री म्हणून कुणा आमदारांना निधी दिला जात नाही. तर, राज्याच्या विकासासाठी नाही दिला जातो, असे सांगत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिवसेनेवर टीका केली. मी निधी कमी दिला असा जर तुमचा आरोप असेल तर आता अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसरे काय केले ? मग, आता तुम्ही त्यांची साथ सोडणार का असा सवालही त्यांनी केला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने