Ajit Pawar : ठाकरे बाईट देऊ लागले अन् तेवढ्यात अजितदादांनी मारला डोळा, व्हिडिओ झाला व्हायरल



ब्युरो टीम : विधानसभेमध्ये आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये सर्वसमावेशक घोषणा दिसतायेत . तर, दुसरीकडे  आगामी निवडणुका समोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर केला गेला असल्याची जोरदार टीका विरोधकांकडून करण्यात येते.  मात्र अर्थसंकल्पावर माध्यमांना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे प्रतिक्रिया देत असताना राज्याचे विरोधी पक्ष नेते व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी  एक अशी कृती केली, ज्याची राजकीय वर्तुळात सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. सर्व प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये नेमकं काय?

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, अजित पवार हे अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देत होते.  त्यावेळी उद्धव ठाकरे येत असल्याचे त्यांना समजले. तसे समजताच अजित पवारांनी त्यांची प्रतिक्रिया आवरती घेतली, आणि उद्धव ठाकरेंना जागा करून दिली. अजितदादांनी उद्धव आणि आदित्य ठाकरे दोघांनाही पाहिल्यानंतर ते बाजूला होत होते. पण तसे होत असतानाच, उद्धव ठाकरेंनी अजितदादांना तिथेच थांबण्याची विनंती केली. त्यावर ते तिथेच थांबले आणि उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया देण्यात सुरूवात केली. नेमके त्याच वेळी अजितदादांनी उद्धव ठाकरे ज्या दिशेला उभे होते, त्यांच्या विरूद्ध दिशेला पाहून कोणाच्या तरी दिशेने हळूच डोळा मारला. त्यांच्या डोळा मारण्याचा अर्थ काय? अन् त्यामागचा हेतू काय? हे कळू शकले नाही. तसेच त्यांनी कोणाकडे पाहून डोळा मारला? हेदेखील समजले नाही. पण या घटनेचा व्हिडीओ मात्र भलताच व्हायरल होत आहे.

पहा व्हिडिओ



0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने