ब्युरो टीम: राज्यात सत्ताबदल झाल्यापासून शिवसेना ( शिंदे
गट ) आणि भाजपवर टीका करताना ठाकरे गट आक्रमक
होताना दिसतात. त्यातच ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव हे जास्तच आक्रमक भूमिका
घेताना दिसत आहेत. राज्यात त्यांना आक्रमक नेते म्हणच ओळखले जाते.
देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून बोलताना आमदार भास्कर जाधव म्हणाले, 'आम्ही तुमच्याकडे देशाचे भावी
पंतप्रधान म्हणून पाहतो. पण, त्यांनी सुडाचे राजकारण करू नये,' असा सल्लाही त्यांनी दिला आहे. काँग्रेस नेते
सत्तेचा पाळणा घेऊनच जन्माला आले होते. मात्र, भाजपचे तसे नाही. भाजपची तब्बल ५० वर्षे विरोधी पक्षातच
गेली आहेत, हे लक्षात ठेवा, असा टोलाही
त्यांनी लगावला आहे.
टिप्पणी पोस्ट करा