Assembly Elections : या राज्यात आले आरपीआय, आता भाजप करणार काय?



ब्युरो टीम: महाराष्ट्रात कसबा पेठ आणि चिंचवडच्या पोटनिवडणूकांची चर्चा सुरू असताना ईशान्येकडील एका राज्यातील निकालाने सर्वांना लक्ष वेधण्यास भाग पाडले आहे. ईशान्यमधील नागालँड राज्याच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने बाजी मारली आहे. त्यामुळे आता या राज्यात आरपीआय भाजपला साथ देणार का, वेगळा काही निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

नागालँडलमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षचे उमेदवार २ जागांवर निवडून आले आहेत. तर, एनडीपीपीचा उमेदवार १ जागेवर निवडून आला आहे. भाजपाचे उमेदवार २ जागेवर निवडून आले असून, १२ जागांवर आघाडीवर आहेत. मात्र, महाराष्ट्राच्या बाहेर देखील रामदास आठवले यांच्या आरपीआय पक्षाचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. ही आठवले यांच्यासाठी ही मोठी गोष्ट असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणूकीत पहिल्यांदाच पक्षाच्या दोन महिला उमेदवारांनी महाराष्ट्राच्या बाहेर विजयाचा गुलाल उधळला आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने