Bageshwar Dham : धीरेंद्र शास्त्रींचा मुंबईमधील कार्यक्रम अडचणीत? नाना पटोलेंच मुख्यमंत्र्यांना पत्र



ब्युरो टीम : बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा १८ आणि १९ मार्च रोजी मुंबईत मीरा रोड येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मात्र, त्यातच आता काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित मोठी मागणी केली आहे. या पत्रात त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती केली आहे की, ‘बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या मुंबईतल्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नका.’

नाना पटोले यांनी पत्राल लिहिलं आहे की...

‘महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. अंधश्रद्धा पसरवणाऱ्या लोकांसाठी या राज्यात जागा नाही. प्रवचनकार धीरेंद्र शास्त्री यांनी जगतगुरू संत तुकाराम महाराजांचा अपमान करून संपूर्ण वारकरी संप्रदायाचा अपमान केला आहे. लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेला धक्का पोहोचवला आहे. संत तुकारामांचा अपमान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्रीच्या कार्यक्रमाला राज्यात कार्यक्रम घेण्यास परवानगी देणे म्हणजे अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यासारखं आहे. म्हणूनच धीरेंद्र शास्त्रीच्या कार्यक्रमाला परवानगी दिली जाऊ नये,’ असं पटोलेंनी पत्रात  म्हंटले आहे. याबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बोलताना पटोले म्हणाले की, ‘बागेश्वरसारख्या मानसिकतेच्या लोकांना सरकारने लगाम लावला पाहिजे. सरकार स्वतःच अशा लोकांना पाठिंबा देऊन राज्यातलं वातावरण बिघडवत असेल तर ही गोष्ट राज्यासाठी चांगली नाही.’

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने