Balasaheb Thorat : शेतकरी अडचणीत, काँगेसच्या बाळासाहेब थोरातांनी केली 'ही' मागणी



ब्युरो टीम : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.  गहू, द्राक्ष, हरभरा, कापूस, कांदा आदी रब्बीची पीकं अडचणीत आली आहेत. त्यातच आता शेतकऱ्यांसाठी काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरातांनी राज्य सरकारकडे मोठी मागणी केली आहे. 'अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. आता शेतकऱ्यांच्या पुढे प्रश्न मदतीचा उभा ठाकला आहे. या संदर्भामध्ये सरकारने भूमिका घेत तात्काळ मदत केली पाहिजे,' असे ते म्हणाले.

नगर येथे शहर काँग्रेस कार्यालयामध्ये आयोजित केलेल्या बैठकीनंतर ते बोलत होते .यावेळी आमदार लहू कानडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा प्रभारी जिल्हाध्यक्ष किरण काळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

'आता पुन्हा अवकाळी पाऊस सुरू झालेला आहे. सोयाबीन कापसाची परिस्थिती वाईट आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने आता शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे,' असे वक्तव्यही  थोरात यांनी केले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने