Bank Recruitment 2023: सारस्वत बँकेत 150 पदांसाठी होणार भरती, असा करा अर्ज



ब्युरो टीम : सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेने लिपिक संवर्गातील कनिष्ठ अधिकारी पदाच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारिख 8 एप्रिल 2023 आहे. सारस्वत बँकेच्या या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार http://www.saraswatbank.com या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

असा करा अर्ज

बँकेच्या अधिकृत वेबसाइट www.saraswatbank.com वर जा.

बँकेच्या मुख्यपृष्ठावर दिसणार्‍या करिअरवर क्लिक करा.

अर्ज दिसेल, त्यावर क्लिक करा आणि भरा.

सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

अर्ज सबमिट केल्यानंतर, भविष्यातील वापरासाठी प्रिंटआउट घ्या.

एकूण रिक्त पदे : 150

शैक्षणिक पात्रता: उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा.

वयोमर्यादा: उमेदवाराचे वय 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे. 

अधिक तपशीलांसाठी संपूर्ण भरती अधिसूचना पहा

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने