Bill Gates Driving : बिल गेट्स यांच्यावर का आली हातात रिक्षाचं स्टेरिंग घेण्याची वेळ? वाचा



ब्युरो टीम : मायक्रोसॉफ्टचे सह- संस्थापक आणि अब्जाधीश बिल गेट्स यांचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात बिल गेट्स यांच्या हातात चक्क रिक्षाचं स्टेरिंग दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलेय.

गेट्स यांनी इलेक्ट्रिक रिक्षा चालवतानाचा व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. बिल गेट्स यांनी त्यांच्या भारत भेटीदरम्यान आनंद महिंद्रा यांचीही भेट घेतली होती. आनंद महिद्रांनी ट्विटरवर गेट्ससोबतचा एक फोटो शेअर करताना ते हार्वर्ड विद्यापीठातील वर्गमित्र असल्याचेही नमूद केले. यानंतर बिल गेट्स यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, यात त्यांच्यातील एक अनोखी मैत्री दिसून येत आहे तसेच व्हिडिओमध्ये गेट्स महिंद्रा ट्रेओ इलेक्ट्रिक रिक्षा चालवताना दिसत आहेत.

या व्हिडीओमध्ये दिसते की, गेट्स अगदी सहजपणे रिक्षा चालवत आहेत. त्यांनी या रिक्षाचे कौतुकही केले. गेट्सच्या या व्हिडिओला भारतात खूप पसंती मिळत आहे. हा व्हिडिओ आत्तापर्यंत 10 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओवर आनंद महिंद्रा यांनीही 'चलती का नाम बिल गेट्स की गाडी’ अशी कमेंट दिलीय. पुढच्या वेळी ईव्ही थ्री व्हीलरची शर्यत तुमच्या आणि सचिन तेंडुलकर आणि माझ्यामध्येच असावी, असेही महिंद्रा यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, गेट्स सध्या भारत दौऱ्यावर आहे, ते भारतातील अनेक नवीन गोष्टींचा, अनुभवांचा आनंद घेत आहेत. अलीकडेच एका व्यावसायिकाने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासोबत त्यांचा जेवण बनवतानाचा व्हिडीओ इंटरनेटवर शेअर केला होता. यानंतर बिल गेट्स कॉलेजचा मित्र आणि बिझनेसमन आनंद्र महिंद्रा यांची भेट घेतल्यामुळे चर्चेत होते.

पहा व्हिडीओ



0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने