BJP: भाजपाचे ‘मिशन लोकसभा २०२४’; विनोद तावडेच्या नेतृत्वात स्थापन केली समिती.....



ब्युरो टीम : आगामी २०२४ ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आतापासूनच रणनीती आखायला सुरुवात केली असून  त्यासाठी राष्ट्रीय स्तरावर तीन जनाची समिती स्थापन करण्यात आली आहे.त्यांच्यावर पायाभूत रणनीती आखण्याची जबाबदारी सोपवली आहे.

देशभरातील लोकसभा मतदारसंघानुसार मुद्यांची जुळवाजुळव करणे, वरिष्ठ नेत्यांच्या भाषणाचा मजकूर गोळा करणे आणि दळणवळणाच्या सुविधा पुरवण्याची जबाबदारी या सरचिटणीसांवर असणार आहे.

यासामितीत निमंत्रक म्हणून पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे असून त्यांच्या सोबत सुनील बन्सल व तरुण चुग हे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. यासोबतच काही पाधाधिकारी देखील सोबत असतील.  

 पक्षाच्या केंद्रीय आणि राज्य कार्यकारिणीच्या वरिष्ठ नेत्यांचे कार्यक्रम ही टीम निश्चित करणार आहे. गेल्या निवडणुकीत ज्या मतदारसंघांत पक्षाचे उमेदवार दुसऱ्या स्थानी राहिले तेथील उमेदवार ठरवणे, राजकीय रणनीती ठरवणे, संघटनात्मक कार्यक्रम राबवणे आणि मतदारांना पक्षाशी जोडण्याचे काम ही टीम करणार आहे.

  

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने