Breaking News : धक्कादायक! नगरमध्ये मुलावर चाकूने सपासप वार



ब्युरो टीम : नगर शहरातील महेश थिएटर रोडवर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या रस्त्यावर अज्ञाताने एका  मुलावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याची घटना घडली आहे. यामध्ये संबंधित मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  दरम्यान, रुग्णालयाचे बाहेर मोठी गर्दी जमली असून पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलावर महेश थिएटर रोडवर हल्ला करण्यात आला. नगर शहरातील कमी वर्दळ असलेला हा रस्ता आहे. तसेच रात्रीच्या वेळी या रस्त्यावर पथदिवे नसल्यामुळे अंधार असतो. त्यातच या रस्त्यावर आज रात्री एका मुलावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याची घटना घडलीय. जखमी अवस्थेत असलेल्या मुलाला  जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला नगर शहरातील एका खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळतच रुग्णालयाच्या बाहेर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे रुग्णालयाच्या बाहेर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.  दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने नगर शहरातील अतिसंवेदनशील ठिकाणांवर बंदोबस्त तैनात केला आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने