by poll pune election :कॉंग्रेस पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार; कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची केले स्पष्ट



 ब्युरो टीम: पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे नुकतेच निधनाने रिक्त झालेल्या जागेवर लवकरच पोटनिवडणूक होणार असून भाजपकडून अनेक नावे पुढे आली आहेत..त्यातच आता या निवडणुकीत कॉंग्रेसने रस दाखवला आहे. कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पुणे लोकसभेची निवडणूक कॉंग्रेस लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या अगोदरच्या पोटनिवडणुका भाजपने बिनविरोध न केल्याने आम्ही यापुढील सर्व निवडणुका लढवणार आहोत.

 भाजपकडून पोटनिवडणूकीसाठी गिरीश बापटांच्या सुनबाई स्वरदा बापट आ. माधुरी मिसाळ माजी राज्यसभा खासदार अंकुश काकडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपा शहराध्यक्ष मा.आ. जगदीश मुळीक समोर आली आहेत. आ.मुक्ता टिळकांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणूकीत भाजपने टिळकांच्या घरात उमेदवारी न देता हेमंत रसाने यांना उमेदवारी दिली होती. यात २८ वर्षानंतर कसब्यात भाजपचा पराभव करत कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर निवडून आले होते. यामुळे भाजपा बापट कुटुंबांबाहेर उमेदवारी देणार का हे पाहणे उसुक्तेचे ठरणार आहे.

त्यातच कॉंग्रेसनेही या पोटनिवडणूकीत आपला उमेदवार उतरविण्याचे ठरवले आहे. यामुळे पुणे लोकसभेच्या पोटनिवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. असे दिसते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने