bypoll election: ही निवडणूक बिनविरोध व्हायला हवा होता - अश्विनी जगताप



ब्युरो टीम:  पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीची आज कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी होत आहे. कसबा मतदार संघाची मतमोजणी कोरेगाव पार्क मधील धान्य गोदामात तर चिंचवड मतदार संघाची मतमोजणी थेरगाव इथल्या शंकरराव गावडे कामगार भवनात होत आहे. दोन्ही मतदार संघात झालेलं मतदान लक्षात घेता कसबा मतदार संघात मतमोजणीच्या 20 फेऱ्या तर चिंचवडमध्ये 37 फेऱ्या होण्याची शक्यता आहे.

कसब्यात कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजपचे हेमंत रासने यांच्यात लढत होत असून चिंचवड मध्ये राष्ट्रवादीचे नाना काटे, भाजपच्या अश्विनी जगताप आणि अपक्ष राहुल कलाटे यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. दरम्यान, चिंचवडमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली असून पोस्टल मतांमध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी आघाडी घेतली आहे. यातच आता भाजपच्या चिंचवड मधील उमेदवार अश्विनी जगताप यांची प्रतिक्रिया आली आहे.

ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. लक्ष्मण जगताप यांनी तेवढा विकास केला आहे. त्यांच्या अकस्मिक जाण्यामुळे ही निवडणूक लागली. इतक्या लवकर निवडणूक लागेल असं वाटलं नव्हतं. विरोधकांनी फॉर्म भरल्यामुळे आमच्या सगळ्यांवर भार पडायला लागला. बिनविरोध झाली असती निवडणूक तर चांगलं झालं असतं. असं जगताप यांनी म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने