bypollelecttion: कसब्यानंतर पिंपरी-चिंचवड मध्येही 'तोच' प्रकार आला समोर; निकालापूर्वीच हायवेवर लागले .....

 


ब्युरो टीम: कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक आरोप-प्रत्यारोपामुळे चांगलीच चर्चेत आली. रविवारी दोन्ही पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडलं. त्यानंतर मात्र निकाल जाहीर होण्या अगोदरच कसब्यात दोन्ही पक्षाच्या उमेदवारांचे अभिंनदनाचे पोस्टर झळकले होते. आता पिंपरी-चिंचवड मध्ये देखील हाच प्रकार पाहायला मिळत आहे. यावेळी भाजपच्या उमेदवार अश्विनीताई जगताप याचे पोस्टर झळकले आहे.   

या निवडणुकीत भाजपकडून अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र निकाल लागण्यापूर्वीच कार्यकर्त्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्याचं चित्र चिंचवड मतदारसंघात दिसून येत आहे. द्रुतगती मार्गावर पोस्टर पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावर चिंचवड मतदारसंघाच्या आमदार म्हणून अश्विनी लक्ष्मण जगताप यांचे फलक झळकवल्याचं पहायला मिळतं आहे. चिंचवड मतदारसंघात भाजप उमेदवार अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे आणि ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे अशी तिरंगी लढत होती.

त्यामुळे निवडणुकीमध्ये मोठी चुरस निर्माण झाल्याचं पहायला मिळालं. उद्या या पोटनिवडणुकीचा निकाल आहे. मात्र त्यापूर्वीच चिंचवडमध्ये मध्यरात्री द्रुतगती मार्गावरील उर्से टोलनाका येथे अश्विनी लक्ष्मण जगताप यांची आमदारपदी निवड झाली अशा अशयाचे फलक लावण्यात आले आहेत.

चिंचवडमध्ये भाजप उमेदवार अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे आणि ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे अशी तिरंगी लढत आहे. उद्या या पोटनिवडणुकीचा निकाल आहे. मात्र त्याचपूर्वी आमदार म्हणून अश्विनी जगताप यांचे पोस्टर लावण्यात आल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने