Chandrakant Patil : गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, 'रिस्क' आणि 'सट्टा'...



ब्युरो टीम: 'आम्ही मंत्रीपदाचा सट्टा लावून एकनाथ शिंदेंबरोबर जाण्याचा निर्णय घेतला,' असं वक्तव्य शिंदे गटाचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं.  त्यांच्या या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहेत. याबाबत भाजपाचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी यावर आपले मतं मांडलं आहे.

'गुलाबराव पाटील यांच्यासारखी माणसं ग्रामीण भागात वाढली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात ज्या भाषेत बोलतात त्या भाषेत ते बोलले. शहरी भागात जरा पॉलिश करून बोलतात. जसं की, आम्ही ‘रिस्क’ घेतली. त्या ‘रिस्क’ला गुलाबराव पाटील आम्ही सट्टा खेळलो असं म्हटले,'  असे चंद्रकांतदादा यांनी म्हंटलं आहे.

नेमकं काय म्हणाले होते गुलाबराव पाटील?

गुलाबराव पाटील म्हणाले होते की, 'नागपूरपासून दादरपर्यंत सर्व आमदार गेले. मी एकटाच राहिलो असतो. मग, विकास करू शकलो असतो का? एकूण ४० आमदार फुटले. त्यात ३३ नंबरला मी गेलो, पण उद्धव ठाकरे चुकीच्या मार्गाने जात होते. त्यांना विनंती केली, हात जोडले, पाया पडलो. आपल्यातील एक मराठा चेहरा लांब जात आहे. तो जाता कामा नये. त्यांना समजवलं पाहिजे, असं उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं. त्यावर संजय राऊत म्हणाले, जायचं तर जाऊदे. मग मी पण गेलो. सरपंच पदाचा राजीनामा देताना लोकं विचार करतात. आम्ही तर आठ मंत्र्यांनी राजीनामा दिला होता. बहुमताचा आकडा जमला नसता तर? मात्र, आम्ही मंत्रीपदाचा सट्टा लावूनचा शिंदेंबरोबर जाण्याचा निर्णय घेतला.'

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने