Cheetah Death: धक्कादायक! नामिबियातून भारतात आणलेल्या चित्त्याचा मृत्यू



ब्युरो टीम : श्योपूर जिल्ह्यातील कुनो नॅशनल पार्कमध्ये गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या मादी चित्त्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. सांगितले जात आहे की, मृत्यू झालेल्या मादी चित्त्याचे नाव साशा होते व तिला किडनीचा विकार होता.



याबाबत कुनो राष्ट्रीय उद्यानानं रितसर प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.प्रसिद्धीपत्रकानुसार, २२ डिसेंबर २०२२ रोजी नामिबियातून मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये आणलेली 'शाशा' नामक मादा चित्ता सुस्तावस्थेत आढळून आला. निरीक्षण पथकाला असं वाटलं की 'शाशा'ला तातबडतोब उपचारांची गरज आहे. त्यानुसार तिला क्वारंटाइन क्षेत्रात आणण्यात आलं. यानंतर तिच्या रिक्ताची चाचणी करण्यात आली. यामध्ये धक्कादाक बाब समोर आली ती म्हणजे शाशाच्या किडनीला संसर्ग झाला होता. पण तिला भारतात आणण्यापूर्वीच संसर्ग झाल्याचं सांगितलं जात आहे.दरम्यान, शाशाची मेडिकल हिस्ट्री देखील तपासण्यात आली, यामध्ये असं आढळून आलं की, शाशाला १५ ऑगस्ट २०२२ रोजी नामिबियात शेवटची रक्ताची चाचणी करण्यात आली यामध्ये रक्तात क्रियेटिनिनचं प्रमाण ४०० पेक्षा अधिक आढळून आलं. यामुळं हे स्पष्ट झालं की, शाशाला किडनीचा आजार हा भारतात आणण्यापूर्वीच जडला होता. पण डॉक्टरांकडून शाशाला वाचवण्याचे अनेक प्रयत्न करुनही अपयश हाती आलं आणि २७ मार्च २०२३ रोजी तिचा अखेर मृत्यू झाला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने