Cheetah : गुड न्यूज! नामिबियावरून भारतात आणलेल्या चित्त्याने दिला चार पिल्लांना जन्म



ब्युरो टीम : श्योपूर जिल्ह्यातील कुनो नॅशनल पार्कमधून एक चांगली बातमी आली आहे. येथे मादी चित्त्याने चार पिल्लांना जन्म दिला आहे. या पिल्ल्यांचा व्हिडिओ सुद्धा कुनो नॅशनल पार्कच्या वतीने ट्विट करण्यात आला आहे. दरम्यान, या पार्कमधून दोन दिवसांपूर्वी एक दुखद बातमी आली होती. पार्कमध्ये आजारी असलेल्या एका मादी चित्त्याचा मृत्यू झाला होता. मात्र, आजचा या पार्कमधून खूपच चांगली बातमी आली आहे. 

मागील वर्षी तब्बल ७० वर्षानंतर पुन्हा एकदा भारत भूमीत चित्ते दाखल झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिनी (17 सप्टेंबर 2022) रोजीच हे ८ चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले होते. त्यापैकी एका चित्त्याचा मृत्यू झाला. पण आता या उद्यानातून चांगली बातमी आली आहे. उद्यानातील एका मादी चित्त्याने चार पिल्लांना जन्म दिला आहे. 

याबाबत कुनो नॅशनल पार्कने केलेल्या ट्विट मध्ये म्हंटले आहे की,'भारताच्या वन्यजीव संवर्धनाच्या इतिहासातील महत्वाची घटना आज घडली आहे. 17 सप्टेंबर 22 रोजी भारतात स्थलांतरित झालेल्या एका चित्त्याने चार पिल्लांना जन्म दिला आहे.'

पहा व्हिडिओ




0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने