ब्युरो टीम : कोविड- 19 बाबत भारतातील सध्याची परिस्थिती काय आहे, भारतामध्ये कोविडच्या अनुषंगाने अद्याप किती लसीकरण केले आहे, याबाबत आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. या प्रसिद्धीपत्रकात नेमकं काय म्हटलं आहे, ते जाणून घेऊया.
1. भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 220 कोटी 65 लाखांहून अधिक मात्रा (95.20 कोटी दुसरी मात्रा आणि 22.86 कोटी वर्धक मात्रा) देण्यात आल्या.
2. गेल्या 24 तासात 1,246 लस मात्रा देण्यात आल्या.
3. भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 6,350 इतकी आहे.
4. उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण रुग्ण संख्येच्या 0.01% इतके आहे
5. रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.8% इतका आहे
6. गेल्या 24 तासात 479 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत (महामारी सुरु झाल्यापासून )देशातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4,41,59,182
7. गेल्या 24 तासात देशभरात 918 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.
8. देशातील दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (2.08%) इतका आहे
9. सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.86%) इतका आहे
10. देशभरात आत्तापर्यंत (महामारी सुरु झाल्यापासून) 92.03 कोटी कोविड तपासण्या घेण्यात आल्या, असून गेल्या 24 तासात 44,225 कोविड तपासण्या घेण्यात आल्या.
टिप्पणी पोस्ट करा