Crime : ३४ ठिकाणी चोऱ्या करणाऱ्या अल्पवयीन युवकासह दोघांना अटक



विक्रम बनकर, नगर : भरदिवसा उघड्या घरातुन मोबाईल फोन चोरी करुन त्याची विल्हेवाट लावणा-या एका अल्पवयीन मुलासह दोघेजण ताब्यात, एकुण ३२ मोबाईल फोन व २ टॅब असा एकुण ४,७०,०००/- रु किंमतीचा मुददेमाल कोतवाली पोलिसांनी हस्तगत करीत जोरदार कारवाई केली आहे.

दि.०३/०२/२०२३ रोजी फिर्यादी नामे कविता संदिप पांढरपोटे (वय ३९ वर्षे धंदा घरकाम, रा बेलेश्वर कॉलनी, आगरकरमळा, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली की, दिनांक ३०/०१/२०२३ रोजी दुपारी ४.०० वाजण्याचे सुमारास बेलेश्वर कॉलनी आगरकरमळा अहमदनगर येथील राहते घरातुन फिर्यादीचा ओपो कंपनीचा ए ३७ मोबाईल फोन व घरात असलेला एक जुना मोबाईल फोन हे कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेला आहे. वगैरे मजकुरच्या फिर्यादी वरुन कोतवाली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं 1 १०७/२०२३ भादवि कलम ३८० प्रमाणे गुन्हा रजि. दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तपास करत असतांना कोतवाली पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा एका अल्पवयीन मुलाने केला असून गुन्हयातील चोरीस गेला मोबाईलफोन सह तो केडगांव लिंकरोड परिसरात येणार आहे.  माहिती मिळाल्याने पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे आदेशाने गुन्हे शोध पथकाने लिंकरोड परिसर येथे सापळा लावला असता तेथे काही वेळाने एका अल्पवयीन मुलगा आला व तो त्याचेकडील एक मोबाईल फोन दोन हजार रुपयांना तेथील काही लोकांना विक्री करण्याकरिता विचारपुस करतांना मिळुन आला. त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे सदर मोबाईल बाबत विचारपुस केली असता त्याने सांगीतले की, सदरचा मोबाईल फोन हा मी बेलेश्वर कॉलनी आगकरमळा येथून चोरी केला होता व तो मी केडगांव वेशीजवळील एका मोबाईल शॉपीमधुन सदर मोबाईलचा लॉक तोडुन फॉरमॅट करुन घेतला आहे.  आता मला पैशांची आवश्यकता असल्याने मी तो विक्री करण्याकरिता घेवुन आलो आहे.  त्यास अधिक विश्वासात घेवुन त्याचेकडे सखोल चौकशी विचारपुस करता त्याने त्याचे नाव सांगुन मी यापूर्वी केडगांव परिसरातून दिवसा उघडे असणारे घरातून वेगवेगळ्या ठिकाणावरुन अनेक मोबाईल फोन व टॅब चोरी केलेले असुन ते त्या फोनचे सिक्युरिटी लॉक तोडण्याकरिता व फॉरमॅट करण्याकरिता केडगांव येथील १) जगदंबा मोबाईल शॉपी २) अस्लम मोबाईल शॉपी यांचेकडे देत असतो. तसेच ते देखील मी त्यांचेकडे दिलेल्या मोबाईलला गि-हाईक पाहून विक्री करुन देतात व त्याबदलयात मला पैसे देतात. असे सांगितल्याने त्यास ताब्यात घेवुन जगदंबा मोबाईल शॉपी चालक सतिष रघुनाथ दुबे (वय २३ वर्षे रा.मोहिनीनगर, केडगांव,अहमदनगर) व अस्लम मोबाईल शॉपी चालक अस्लम फकीरमोहंमद सय्यद (वय २५ वर्ष रा. केडगांव वेस, केडगांव ,अहमदनगर ) यांचेकडे जावून अधिक चौकशी केली असता त्यांनी विकत घेतलेला चोरीचा मुद्देमाल दुकानात विक्री करण्याकरिता ठेवलेले त्या मध्ये ०७ सैमसंग ०४ ओप्पो, ०८ विवो, ०१ एलजी, ०४ एमआय, ०२ मोटो, ०१ लिनोवा, ०१ टेक्नो, ०२ रेडमी, १ प्लस एक, ०१ होनर एकुन ३२ मोबाईल फोन व दोन टॅब ०१ समसंग व ०१ लेनोवा असे एकुन ४,७०,०००/- रु किंमतीचे चोरी केलेले विक्री करिता ठेवलेले मोबाईल फोन मिळुन आले. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहेकॉ गणेश धोत्रे हे करीत आहेत. सदरची कारवाई ही  पोलीस अधिक्षक  राकेश ओला , अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी  अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोसई मनोज कचरे, मपोसई शितल मुगडे, पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, रियाज इनामदार, योगेश खामकर, संदिप थोरात, अमोल गाडे, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सागर मिसाळ, अशोक सायकर, अशोक कांबळे, जयश्री सुद्रिक यांच्या पथकाने केली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने