CSK vs GT : आजपासून IPLचा थरार



ब्युरो टीम : आयपीएलच्या 16 व्या हंगामाला आजपासून सुरुवात होत आहे. क्रिकेट चाहत्यांना पुढील 2 महिने टी-20 क्रिकेटचा थरार अनुभवता येणार आहे. या हंगामातील पहिली लढत चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स या दोन संघात होत आहे.

आयपीएल २०२३ मधील पहिली लढत चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स या दोन संघात होत आहे. चेन्नई हा लीगमधील दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी संघ आहे तर गुजरातने पहिल्याच हंगामात सर्व दिग्गज संघांना धक्का देत विजेतेपद मिळवले होते. १६व्या हंगामातील या पहिल्या लढतीकडे सर्वांचे लक्ष असेल.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांना आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने करायची आहे. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या स्वतः महेंद्रसिंग धोनीचा मोठा चाहता आहे आणि धोनीकडून तो खूप काही शिकला आहे. अशा परिस्थितीत धोनी आणि हार्दिक यांच्यातील लढत खूपच रोमांचक असेल. दोन्ही संघात काही बदल करण्यात आले असून मिनी लिलावात दोन्ही संघांनी काही चांगले खेळाडू जोडले आहेत.

गुजरात संघात अष्टपैलू हार्दिक पांड्या व्यतिरिक्त फलंदाज शुबमन गिल उत्कृष्ट फॉर्मात आहे. फिरकीपटू राशिद खान अशा गोलंदाजांपैकी एक आहे जो आपली लय आणि सातत्य राखतो. अशा परिस्थितीत गुजरात संघाला पराभूत करणे हा सोपा खेळ नाही.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने