daya nayak : एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक पुन्हा मुंबई पोलीस दलात



ब्युरो टीम : सध्या महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकात कार्यरत असणारे एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांची पुन्हा एकदा मुंबई पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. नायक यांच्यासह काही पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आल्याचं पत्रक जारी करण्यात आलं आहे.

दया नायक १९९५ मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्त झाले. प्रदीप शर्मा यांच्यासोबत त्यांना गुन्हे अन्वेषण विभागात काम सुरू केले. दया नायक हे शर्मांच्या एन्काउंटर पथकात होते. त्यांनी १९९६ मध्ये पहिला एन्काउंटर केला होता. त्यांनी ८० हून अधिक गुंडांचे एन्काउंटर केल्याची माहिती आहे. त्यामुळेच त्यांना एन्काउंटर स्पेशालिस्ट अशी ओळख मिळाली.

दरम्यान, दया नायक यांच्यासह दौलत साळवे, ज्ञानेश्वर वाघ यांचीही दहशतवादविरोधी पथकातून मुंबई पोलीस दलात बदली करण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने