Defense Minister : राजनाथ सिंह यांनी केला ऑस्ट्रलियाच्या संरक्षणमंत्र्यांना फोन, वाचा कारण



ब्युरो टीम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी  आज (9 मार्च 2023) ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री रिचर्ड मार्ल्स यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. दोन्ही मंत्र्यांनी द्विपक्षीय संरक्षण संबंध अधिक दृढ करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेवर मोहोर उमटवली. हा दूरध्वनी संवाद विशेषत: संरक्षण आणि सुरक्षेशी संबंधित विषयांवर उभय देशांमधील विश्वास आणि मैत्री प्रतिबिंबित करतो.

भारत आणि ऑस्ट्रेलिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीचा पाठपुरावा करत आहेत, आणि दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य अलिकडच्या वर्षांत सातत्यानं वृद्धींगत होत आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने