devendra fadanvis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; निवडणूक आयोगाकडे तक्रार


ब्युरो टीम: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कसबा पोट निवडणुकीत केलेय एका वक्तव्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. कारण कसबा पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. आचारसंहिता भंग केल्याचा आरोप करत धंगेकर यांनी तक्रार दाखल केली आहे. प्रचारात धर्माचा वापर करून समाजात दुही माजवण्याचा फडणवसांकडून प्रयत्न झाल्याचं धंगेकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहिता भंग केला. त्यांनी तेढ निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अशी तक्रार मुख्य निवडणूक आयुक्तांकडे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने