ब्युरो टीम : नगर तालुक्यातील साकलाई सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाच्या संदर्भामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी निधी मंजुरीची घोषणा केलेली होती. दिलेल्या निधीमुळे आता या योजनेला मुहूर्त मिळेल, अशी शक्यता आता वर्तवण्यात आलेली आहे. नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी व खासदार सुजय विखे यांनी पुढाकार घेत उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निधीसाठी त्यांचा नागरिक सत्कार करायचा अशी कल्पना मांडली होती, त्यानुसार आज नगर तालुक्यातील रुईछत्तीशी या ठिकाणी फडणवीस यांच्या नागरी सत्कार व शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र फडणवीस यांनी रविवारी नगर जिल्ह्याचा दौरा टाळला असून याची राजकीय वर्तुळात सुरू आहे.
राज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा संप, कांद्याचा प्रश्न व इतर आंदोलने पाहिल्यानंतर फडणवीस यांनी रविवारी नगर जिल्ह्याचा दौरा टाळला असल्याची राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, या सत्कार सोहळ्याची तयारी गेल्या आठवड्यापासून सुरू होती. राज्यात सध्या सरकारी कर्मचाऱ्यांचा संप तसेच कांदा प्रश्न हा राज्यभरामध्ये पेटलेला आहे, दुसरीकडे शेतकऱ्यांची इतर आंदोलन सुद्धा आता सुरू झाली आहेत. या सर्व बाबींचा विचार करता फडणवीस यांनी रविवारचा दौरा रहित केला असावा, अशी चर्चा आहे.
टिप्पणी पोस्ट करा