ब्युरो टीम : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचं संसदेचं सदस्यत्व रद्द करण्यात आल्यानंतर काँग्रेसने आंदोलन सुरू केलं आहे. तसंच राहुल गांधी यांनी सदस्यत्व रद्द झाल्यानंतर पत्रकार परिषदही घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका केली. त्यातच आता राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर बायोमध्ये मोठा बदल केला आहे. त्यांनी आता आपल्या बायोमध्ये Disqualified MP म्हणजे अपात्र लोकसभा खासदार असं लिहिलं आहे.
सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांच्या मानहानीच्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. राहुल गांधी यांच्यावर कोर्टाने ही कारवाई केल्यानंतर संसदेने त्यांची खासदारकी रद्द केली. यानंतर काँग्रेस आक्रमक झालं आहे. संकल्प सत्याग्रहही सुरू केला आहे. देशात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येतं आहे. अशा सगळ्यात राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्वीटर बायोमध्ये मोठा बदल केला आहे. त्यामुळे याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा