Dr sujay vikhe : नगरच्या अंगणवाडीसेविका दिल्लीत, खासदार विखेंमुळे झाली मंत्र्यांची भेट



ब्युरो टीम : अखिल भारतीय अंगणवाडी सेविका फेडरेशनच्या अहमदनगर जिल्ह्यातील ७२ अंगणवाडी सेविका त्यांच्या विविध मागण्यांसाठी दिल्ली येथे पोहोचल्या होत्या. यावेळी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी त्यांची केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांची लोकसभेत भेट घडवून आणली. यावेळी आपल्या मागण्या मंजूर करण्याबाबत अंगणवाडी सेविकांनी इराणी यांना लेखी निवेदन दिले.

या अंगणवाडी सेविकाची मागणी रास्त असून बरेच दिवसा पासून प्रलंबित आहे. त्यावर आपण सहनभुती पूर्वक विचार करून त्यांना न्याय द्यावा, अशी विनंती खासदार विखे यांनी स्मृती इराणी यांच्याकडे केली.  यावर, मंत्री स्मृती इराणी यांनी या मागण्या बाबत आपण सविस्तर माहिती घेवून निश्चित पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले. 


दरम्यान, थेट केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांची भेट होऊन आपल्या मागण्या बाबत त्यांच्याशी चर्चा करता आली याबद्दल अंगणवाडी सेविका फेडरेशनच्या सेविकांनी सुजय विखे पाटील यांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने