DRDO : डीआरडीओ कार्यशाळेचे नवी दिल्ली येथे संरक्षण दल प्रमुखांनी केले उद्घाटन



ब्युरो टीम :संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी आज,  15 मार्च 2023 रोजी नवी दिल्ली येथे 'ह्युमन फॅक्टर्स इंजिनिअरिंग इन मिलिटरी प्लॅटफॉर्म्स' या मानवी घटक अभियांत्रिकीशी निगडीत विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन केले. या कार्यशाळेचे आयोजन  संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या  (डीआरडीओ)  दिल्लीतील प्रयोगशाळा शरीरशास्त्र आणि संबंधित विज्ञान संरक्षण संस्था (DIPAS) यांनी केले आहे. 

संरक्षण क्षेत्रात मानवी घटक अभियांत्रिकी (HFE) ची वैज्ञानिक अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी धोरणात्मक आराखडा आणि पद्धती विकसित करणे हे या कार्यशाळेचे उद्दिष्ट आहे, ज्यामुळे ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेला चालना मिळेल.  मानवी घटक अभियांत्रिकी  हे  मानवी क्षमता आणि मर्यादा लक्षात घेऊन साधने आणि प्रणालींच्या   डिझाइनच्या सुरक्षित आणि प्रभावी वापरासाठीशी संबंधित शास्त्र आहे.

यावेळी बोलताना संरक्षण दल प्रमुखांनी सैनिकांसाठी योग्य स्वदेशी शस्त्रे बनवण्यासाठी गुणात्मक आवश्यकता आणि डिझाइनच्या टप्प्यावर मानवी घटक अभियांत्रिकीचा समावेश करण्याच्या गरजेवर भर दिला.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था मुख्यालयाचे महासंचालक आणि भविष्यकालीन संरक्षण तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या प्रयोगशाळांचे संचालक, वरिष्ठ शास्त्रज्ञ, धोरणात्मक योजना तयार करणाऱ्यांचे प्रतिनिधी, युद्धनौका आरेखन मंडळ, सशस्त्र लष्करी तुकडी, पायदळ, युद्धनौका आरेखन मंडळ, भारतीय वायुसेना आणि अनेक संरक्षण उद्योग आणि संरक्षण संबंधीत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे वरिष्ठ अधिकारी या कार्यशाळेला उपस्थित आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने