ब्युरो टीम : राजधानी दिल्लीतून मोठी बातमी समोर येत आहे. दिल्लीत भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. दिल्ली-एनसीआर परिसरात हे भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती मिळत आहे. भूकंपाचे धक्के जाणवल्यावर नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. भूकंपाच्या धक्क्यानंतर नागरिक घराच्या बाहेर पडले. 'एएनआय' ने याबाबत वृत्त दिले आहे.
पूर्ण उत्तर भारतातील नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाच्या तीव्र धक्कानंतर भीतीने श्रीनगर आणि उत्तरप्रदेशच्या गाझियाबादमधील नागरिक घरातून रोडवरती आले. भूकंपाने अद्याप कोणतेही नुकसान झाल्याची माहिती समोर आली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगानिस्तानमधील फैजाबाद आहे. तसेच, पाकिस्तानमधील इस्लामाबाद, लाहौर आणि पेशावरमध्ये सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता ६.६ रिश्टर स्केलची असल्याचं सांगितलं जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा