Eknath Shinde : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साईचरणी



ब्युरो टीम : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिर्डी येथे श्री साईबाबा समाधी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. साईबाबा समाधीचे दर्शन घेताना शिंदे यांनी साईबाबांना कोणते साकडे घातले, याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत.

शिर्डी येथे आयोजित महापशुधन एक्स्पो चा समारोप आज झाला. या कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे आले होते. यावेळी त्यांनी साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी महसुल व पशु संवर्धन आणि दुग्‍ध विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील, ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण व क्रिडा आणि युवक कल्‍याण मंत्री गिरीश महाजन, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, श्री साईबाबा संस्‍थान तदर्थ समिती सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी सिध्‍दाराम सालीमठ, जिल्‍हापरिषद मुख्‍य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, खासदार सुजय विखे पाटील, संस्‍थानचे प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव आदी उपस्थित होते.  समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर शिंदे यांचा सत्‍कार  साईबाबा संस्‍थानच्या वतीने  सत्कार करण्यात आला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने