eknath shinde: मुख्यमंत्री करणार रामजन्मभूमीचा दौरा : अयोध्येत जाऊन उचलणार शिवधनुष्य



ब्युरो टीम: शिवसेना नाव आणि धनुष्यचिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी मंत्री, शिवसेना आमदार आणि खासदारांचा अयोध्या दौरा आता 9 एप्रिल 2023 रोजी होणार आहे. रामनवमी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली.

शिवसेना नाव आणि धनुष्यचिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सहकाऱ्यांसह अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहे. 9 एप्रिलला अयोध्येचा दौरा ठरला आहे. या दौऱ्यादरम्यानच साधू, संत आणि महंतांकडून मुख्यमंत्री शिंदे हे शिवधनुष्य स्विकारणार असल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला द्यायचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर एकनाथ शिंदे यांनी अयोध्येला जाण्याची घोषणा केली होती. अखेरीस आज रामनवमीच्या दिवशी अयोध्या दौऱ्याची तारीख ठरली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने